कसे एक्‍सपोर्ट करावे ब्राउझरमधील सेव्‍ह केलेले पासवर्ड?

0
366
Export Saved Passwords From Browsers in Marathi

Export Saved Passwords From Browsers in Marathi

या लेखात, मी आपल्याला CSV (Comma Separated Values) फाइलमध्ये लॉगिन तपशील कसे एक्‍सपोर्ट एक्‍सपोर्ट करायचे ते दाखवणार आहे. काही वेळा तुम्‍हाला काही कारणास्‍तव ब्राउझरमध्ये सेव केलेले पासवर्ड एक्‍सपोर्ट करायचे असू शकतात – उदाहरणार्थ जेव्हा तुम्‍हाला एका ब्राउझरमधून दूस-या ब्राउझरमध्ये शिफ्ट करायचे असते किंवा दूस-या पासवर्ड मैनेजर मध्‍ये हे पासवर्ड ट्रांसफर करायचे असते. किंवा फक्त त्यांच्या सर्व लॉगिनची एक प्रत तुमच्‍या हातात हवी असते. लॉगिन एक्‍सपोर्ट आणि इंपोर्ट करण्यासाठी बहुतेक सर्व ब्राउझरद्वारे वापरलेले फॉर्मेट CSV आहे आणि बर्‍याच पासवर्ड मैनेजर्ससाठी इंपोर्ट फॉर्मेट आहे.

Export Saved Passwords From Browsers in Marathi

1) पासवर्ड एक्‍सपोर्ट करा – Google Chrome मधून

ऑप्‍शन मेनू ओपन करण्‍यासाठी अ‍ॅड्रेस बारच्या अगदी उजवीकडे असलेल्या तीन लहान उभ्या बिंदूंवर क्लिक करा आणि Settings वर क्लिक करा

Export Saved Passwords From Browsers in Marathi

Autofill वर क्लिक करा (डावीकडील पॅनेलमध्ये) आणि नंतर मुख्य पॅनेलमध्ये Passwords वर क्लिक करा

Export Saved Passwords From Browsers in Marathi

Saved Passwords ला लागून असलेल्या तीन लहान उभ्या ठिपक्यांवर क्लिक करा आणि नंतर Export passwords वर क्लिक करा

पॉपअप विंडोमध्ये पुन्हा Export passwords वर क्लिक करा

आपल्याला आता आपला मायक्रोसॉफ्ट अकाउंट पासवर्ड किंवा पिन इनपुट करण्याची आवश्यकता असेल.

एकदा आपण हे पूर्ण केल्यावर आपल्याला सेव्ह विंडोवर नेले जाईल. डीफॉल्ट फाइलनाव Chrome Passwords असेल.

पासवर्ड एक्‍सपोर्ट करा – Firefox मधून

Export Saved Passwords From Browsers in Marathi

ऑप्‍शन मेनू ओपन करण्यासाठी अ‍ॅड्रेस बारच्या अगदी उजवीकडे असलेल्या तीन आडव्या ओळी क्लिक करा आणि नंतर Logins and Passwords वर क्लिक करा

आता आपल्याला आपला मुख्य पासवर्ड इनपुट करण्यास सांगितले जाईल

Export Saved Passwords From Browsers in Marathi

डावीकडील पॅनेल खाली सूचीबद्ध असलेल्या सर्व लॉगिनच्या तपशीलांसह Firefox Lockwise शीर्षक अंतर्गत एक पेज उघडेल

शीर्षक बारच्या अगदी उजवीकडे असलेल्या तीन लहान आडव्‍या ठिपक्यांवर क्लिक करा आणि Export Logins वर क्लिक करा

पॉपअप विंडोमध्ये Export वर क्लिक करा

आपल्याला पुन्हा आपला मुख्य पासवर्ड इनपुट करण्यास सांगितले जाईल

नंतर सेव्ह विंडो उघडेल. डीफॉल्ट फाइलनाव Logins असेल

आता तुम्‍ही या एक्‍सपोर्ट झालेल्‍या फाइलला एकतर तुमच्‍या पीसी मध्‍ये सेव्‍ह करून ठेवू शकता किंवा वरील स्‍टेप्‍स चा वापर करून दूस-या ब्राउझरमध्‍ये इंपोर्ट करू शकता.

Previous article२५ मजेदार वाय-फाय नावे जी तुमच्‍या शेजार्‍यांना गोंधळात टाकतील
Next articleBrexit would Trigger ‘Economic and Financial Shock’ to UK

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.